मराठी तक्रार पत्राचा नमुना 2023 | Takrar patra in Marathi

<a href=Takrar patra in Marathi" width="1366" height="768" />

Takrar patra in Marathi – खाली दिलेल्या हा एक औपचारिक पत्राचा (formal letter in Marathi) नमुना आहे. तक्रार पत्र खाली एका विषयवरती संपूर्ण मराठी मध्ये लिहिले गेले आहे. तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा.

तक्रार पत्र | Takrar patra in Marathi

विषय : ऑनलाईन खरेदी केलेला चलभाष सदोष निघाला आहे. ग्राहक पंचायतीकडे योग्य ती तक्रार
नोंदवा. (प्रेषक : सलील शंकर पाटील)

सलील शंकर पाटील
नवा मारुती चौक, पारिजात कॉलनी,
बार्शी – ४१३४११. जिं. सोलापूर
[email protected]
चलभाष क्र. ९७९७९०१११२
दि. १८/११/२०१४

प्रति,
मा. अध्यक्ष, ग्राहक पंचायत, पुणे.

विषय : ऑनलाईन खरेदी केलेला चलभाष संच सदोष निघाल्याबाबत

महोदय,
मी, शनिवार, दि. १८ ऑक्टोबर, २०१४ रोजी ‘खरेदी’ (www.kharedee.com) या संकेतस्थळावरून ‘बोलाबोला’ कंपनीचा ‘बोलो-ई’ (Bolo-E) हा चलभाष संच खरेदी केला आहे. याची खरेदी रक्कम रु. ६,९९९/- मी माझ्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यातून अंतरित केली आहे. त्यानुसार मला ‘बोलाबोला कंपनीकडून बुधवार, दि. २२ ऑक्टोबर,
रळ असावी. जास्त पाल्हाळ न लाव २०१४ ला ‘मेघदूत’ या कुरियर कंपनीमार्फत सदर संच मिळाला.
कंपनीच्या नियमानुसार कुठलाही संच वापरण्यास योग्य नसल्यास ८ दिवसांच्या आत तक्रार करता येते. सदोष संच बदलून मिळतो किंवा त्यासाठी भरलेले पैसे परत मिळतात. मी खरेदी कलेला हा संच सुरू केल्यापासून अधून-मधून कधीही बंद पडतो आणि कधीही होतो. त्याप्रमाणे तशी तक्रार मी रविवार, दि. २६ ऑक्टोबर, २०१४ ला ई-पत्राद्वारे कंपनीकडे केली आहे.
.मात्र मला कंपनीकडून आलेल्या ऑनलाईन खरेदीचा दिनांक १८ ऑक्टोबर, २०१४ गृहीत धरून माझी तक्रार निकाली काढण्यात आली आहे. या विषयात पुरेसा खुलासा करणारे पत्र सोमवार, दिनांक ३ नोव्हेंबर, २०१४ ला मी कंपनीला पाठविले आहे. यात मला चलभाष मिळालेल्या दिनांकापासून ८ दिवसात मी तक्रार नोंदवलेली आहे, हा खुलासा केला आहे. मात्र त्या पत्राला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कंपनीच्या भारतातील दिल्ली येथील मुख्य कार्यालयाला मी पत्र लिहिले . त्यात उपरोक्त दोन्ही पत्रे सोबत जोडली आहेत. हा व्यवहार स्पीडपोस्टने केला असून त्याची पोहोचपावती देखील मला मिळाली आहे.
मात्र तक्रार करून १ महिना होऊन गेला तरी मला कंपनीकडून काहीही कळविले गेले नाही. या एकंदर व्यवहारात माझी फसवणूक झाल्याचे माझ्या लक्षात आले आहे, मला मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे मला न्याय मिळावा, अशी माझी इच्छा आहे. आपली संस्था ग्राहकांच्या अशा तक्रारीचा पाठपुरावा करते आणि ग्राहकाला न्याय मिळवून देते, याची जाणीव असल्याने हे पत्र आपल्याला पाठवीत आहे. तरी माझ्या या तक्रारीचा अभ्यास करून आपण मला मार्गदर्शन करावे, ही विनंती.

आपला,
(सलील शंकर पाटील)

सोबत

  1. कंपीनीशी झालेला आवक-जावक इ-पत्रव्यवहार
  2. टपालाने केलेल्या व्यवहाराची छायाप्रत
  3. खरेदी पावती-छायाप्रत
  4. चलभाष संच मिळाल्याची दि. २२ ऑक्टोबर, २०१४ ची कुरियर पावती.

तक्रार पत्र सरावासाठी विषय | Takrar patra –

निष्कर्ष | Conclusion

आज आपण मराठी व्याकरण मधील मराठी पत्र आणि मराठी पत्रलेखन याबद्दल संपूर्ण माहिती पहिली. तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला या [email protected] यावरती मेल करू शकता. आम्ही तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर देऊ.